शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:32 IST

- मनोज गडनीस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईत आता तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना (शिंदेगट ...

- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईत आता तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना (शिंदेगट वि. उद्धवसेना), हा सामना रंगणार आहे. मात्र, त्यातही मुंबई दक्षिण-मध्यमध्ये दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले शिंदेसेनेचे राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले अनिल देसाई यांच्यातील लढत यावेळी अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. 

२०१४ आणि २०१९ या दोन्ही  निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार  राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. यंदा मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात होणारा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे. माहिम, धारावी, वडाळा, सायन-कोळीवाडा, चेंबूर, अणुशक्तीनगर या सहाही विधानसभा क्षेत्रांतील चित्रही बदलू शकते. २०१४ मध्ये मोदी लाटेत अनेकांना पराभवाचा फटका बसला होता. मात्र, २०१९ मध्ये धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, चेंबूरमधील काही भागांतील मते ही शेवाळे आणि गायकवाड यांच्यात मोठ्या प्रमाणावर विभागली गेली होती. मात्र, माहिम, चेंबूर पश्चिमेचा भाग आणि अणुशक्तीनगर येथील मध्यमवर्ग व उच्चमध्यम वर्गाची बहुतांश मते शेवाळे यांना मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र, हाच मध्यमवर्ग यंदा देसाई यांच्या पारड्यात मते टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मतदारसंघाचा इतिहास१९५२ पासून १९८९ पर्यंत दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टीमध्येच प्रामुख्याने लढत झालेली आहे. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे येथून १९५७ आणि १९६७ साली निवडून आले आहेत. तर १९८४ मध्ये डॉ. दत्ता सामंत येथून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर १९८९ साली शिवसेनेचे वामनराव महाडिक त्यानंतर मोहन रावले यांनी बराच काळ हा गड राखला होता. २००९ काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड येथून २ लाख ५७ हजार मतांनी निवडून आले. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या मतांची विभागणी मनसेसोबत झाली होती व त्याचा फायदा एकनाथ गायकवाड यांना झाला होता. 

राहुल शेवाळे I शिंदेगटअविभाजीत शिवसेनेत राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते होते. शिवसेनेत शाखा प्रमुख पदापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१४ पर्यंत ते पालिकेमध्ये नगरसेवक होते. ते सलग चारवेळी मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ साली प्रथम ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि निवडून आले.

अनिल देसाई I उद्धवसेनाउद्धवसेनेचा संयत चेहरा अशी अनिल देसाई यांची ओळख आहे. पडद्यामागून संघटना बांधणी करणे, पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळणे आदी भूमिका ते पार पाडतात. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २००२ साली ते शिवसेनेच सचिव झाले. २०१२ साली प्रथम त्यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवले. तेव्हापासून ते राज्यसभेवर आहेत.

टॅग्स :mumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्यRahul Shewaleराहुल शेवाळेAnil Desaiअनिल देसाई