शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: धनुष्यबाण की स्वाभिमान?; राऊतांना अ‍ॅडव्हाटेंज की राणे काढणार विकेट? 

By बाळकृष्ण परब | Updated: April 24, 2019 15:33 IST

गेल्यावेळी 1 लाख 50 हजार मतांनी विजयी होणाऱ्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांना नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी कडवी टक्कर दिल्याने यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह कोकणी माणसांमध्ये सुरू आहे.

- बाळकृष्ण परबसतराव्या लोकसभेसाठी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काल कमालीच्या शांततेत मतदान पार पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशील भाग म्हणून या मतदारसंघाची ओळख असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र यावेळी काही अपवाद वगळता येथील निवडणूक शांततेत झाली. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही येथे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना येथे रंगला. नाही म्हणायला काँग्रेसचा उमेदवारही येथे रिंगणात होता. मात्र त्याची उपस्थिती प्रत्यक्ष लढतीपेक्षा इव्हीएमवर नाव येण्यापुरतीच राहिली. मात्र गेल्यावेळी 1 लाख 50 हजार मतांनी विजयी होणाऱ्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांना  नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी कडवी टक्कर दिल्याने यावेळी इथे अटीतटीची लढत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह कोकणी माणसांमध्ये सुरू आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाग माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेत असतानापासूनचा बालेकिल्ला. मात्र 2014च्या लोकसभा आणि त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तो सर केला. त्यामुळे हातातून निसटलेला हा गड पुन्हा सर करायचाच या ईर्षेने नारायण राणे आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीत लढला. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा चेहरा आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असूनही शिवसेना-भाजपाची या मतदारसंघात राणेंचे आव्हान मोडून काढताना दमछाक होताना दिसली.खरंतर कार्यकर्त्यांचे बलाबल पाहता शिवसेना आणि स्वाभिमान हे या मतदार संघात समसमान पातळीवर होते. त्यातही विद्यमान खासदारांसह लोकसभा मतदारसंघातील एकूण सहापैकी पाच आमदार दिमतीला असल्याने शिवसेनेचे पारडे कमालीचे जड होते. पण राणेच्या आक्रमक प्रचारासमोर ही मंडळी बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. विशेषत: सध्याच्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणाऱ्या सोशल मीडियाच्या वापरामध्येही राणे समर्थकांची सोशल मीडिया टीम शिवसेनेपेक्षा अनेक पटींनी आघाडीवर दिसली.मात्र या मतदारसंघाचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे स्पष्टपणे पडणारे दोन भाग शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचा अंदाज  मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यक्त होत आहे. एकंदरीत कल पाहता सिंधुदुर्गात शिवसेना आणि स्वाभिमानमध्ये अटीतटीची लढत झाल्याची चर्चा आहे. त्यात स्वाभिमानच्या निलेश राणे यांनी आघाडी घेतल्याचाही दावा केला जात आहे. तर रत्नागिरीमध्ये असलेल्या वर्चस्वाच्या जोरावर विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत आहे.  मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये सिंधुदुर्गातील कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण आदी भागात स्वाभिमानचा जोर दिसून आला. तर शिवसेनेच्या वैभव नाईक यांचे वर्चस्व असलेल्या कुडाळ आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघातही स्वाभिमानने धनुष्यबाणाला घाम फोडल्याचे बोलले जात आहे. मात्र या भागात धनुष्यबाणही अचूक चालल्याचा दावा केला जात आहे. एकंदरीत तोडीस तोड झालेल्या या लढतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान आघाडीवर राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या मतदारसंघाचा वरचा भाग असलेल्या रत्नागिरीत मात्र धनुष्यबाणाने आपले वर्चस्व राखल्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गाच्या तुलनेत रत्नागिरीमध्ये स्वाभिमानची ताकद तितकीशी नाही, ही बाब शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर-चिपळूण आदी भागांमध्ये शिवसेनेने आपली ताकद कायम राखली आहे. नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्याने शिवसेनेला होणाऱ्या विरोधाची धारही बोथट झाली. त्यातच मतदानापूर्वी स्वाभिमानचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने स्वाभिमानच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे या भागातील तिन्ही मतदारसंघात शिवसेनेने 2014 च्या आसपास जाणारी आघाडी घेतल्याची चर्चा आहे. त्याशिवाय ठरावीक मतदारांकडून काँग्रेस उमेदवाराला झालेल्या मतदानाचा फटकाही गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या निलेश राणे यांना बसल्याचे सांगितले जात आहे. जर काँग्रेसचा उमेदवार लढतीत नसता आणि राणे विरुद्ध राऊत अशी थेट लढत झाली असती तर  विनायक राऊत यांना ही निवडणूक अजूनच जड झाली असती, अशी शक्यताही अनेक कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत. तसेच राऊतांवर नाराज असलेल्या भाजपातील काही कार्यकर्त्यांची मते स्वाभिमानकडे वळल्याचेही कानावर येत आहे.  एकंदरीत चित्र पाहता शिवसेना आणि स्वाभिमानच्या थेट लढतीत काँग्रेसच्या उमेदवाराने ठरावीक मते आपल्या बाजूला वळवून लढतीत रंगत आणली आहे. त्यातही रत्नागिरी शिवसेनेच्या बाजूने तर सिंधुदुर्ग राणेंच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या 23 मे रोजी मतमोजणीवेळी विनायक राऊत आणि निलेश राणेंमध्ये अटीतटीची लढत दिसून येणार आहे. मात्र मतदारांनी नेमका काय कल दिला आहे ते समजण्यासाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा!!!

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष