शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘कुर्बानी देणार कोण? शरद पवार? उद्धव ठाकरे? की…’, राज्यसभा, विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:51 IST

Rajya Sabha Election News: महाराष्ट्रातील सध्याच्या गोळाबेरजेनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये केवळ प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणााला आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी बुधवारी निवडणूक जाहीर झाली असून, सध्याच्या गोळाबेरजेनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये केवळ प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. तसेच मैत्रीमध्ये कुर्बानी कौन देगा? असा सवाल भाजपाने विचारला आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आंखे चित्रपटातील उदाहरण देत लिहिलं की, गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आंखें चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे. दोघे जिवलग मित्र, दोघेही बिंदूवर प्रेम करणारे असतात आणि पार्टीत बिंदूही दोघांकडे सारखंच लक्ष देते. तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात की, “एकाला कुर्बानी द्यावी लागेल…”. त्यानंतर कादर खान थेट सवाल विचारतात की, “कुर्बानी देगा कौन?” आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका हे होय.

या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते. त्यात राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत, यासाठी संजय राऊत आग्रही आहेत. काँग्रेसने स्पष्ट अशी अट घातली आहे. राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला, तर विधानपरिषदेला उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्टपणे सांगितलं आहे.  म्हणजेच समीकरण स्पष्ट आहे. त्यामुळे यात एकाची अडचण ठरलेलीच आहे. आता या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार? उद्धव ठाकरे? की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार? असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा