शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लाखो परप्रांतिय कामगारांच्या परतीचा खर्च कोण करणार? राज्य सरकारसमोर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:12 IST

CoronaVirus Marathi News महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे.

मुंबई : कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने राज्य सरकारांचेही कंबरडे मोडलेले आहे. त्यातच बुधवारी केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी नियमावली जारी करत राज्यांवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. यामुळे या सर्वांच्या घरवापसीचा खर्च कोण उचलणार हा मोठा प्रश्न राज्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यभरात रोजगारासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून लाखो लोक आलेले आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना स्वगृही जायचे आहे. या सर्वांचा घरवापसीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा, असा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. यावर आज रात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात १२ ते १३ लाख प्रवासी आहेत, त्यापैकी १० लाख त्यांच्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत. जर महाराष्ट्र सरकारने या सर्वांचा खर्च उचलला तर त्याचा खूप मोठा आर्थिक बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पंजाब मॉडेल तपासत आहोत. नांदेडमध्ये अडकलेल्या त्यांच्या पर्यटकांना पंजाब सरकारने त्यांच्या खर्चाने व्यवस्था करून नेले होते. आम्हीही महाराष्ट्र परिवाहनच्या बसेस अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविल्या आहेत. यामुळे अन्य राज्यांनीही त्यांच्या नागरिकांना नेण्यासाठी स्वत:ची सोय करावी. 

उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारयाशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. सर्व राज्यांना या प्रवाशांची माहिती आणि नेमका आकडा असलेला मसुदा तयार करावा लागणार आहे. कारण हे प्रवासी राज्यभरात पसरलेले आहेत. 

काय आहेत प्रस्ताव?पहिल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र सरकार एसटी बसद्वारे त्या त्या राज्यांच्या प्रवाशांना त्या राज्यांच्या सीमेवर सोडणार आहे. मात्र, हा प्रस्ताव खूप जोखमीचा ठरल्याने बाजुला करण्यात आला आहे. संबंधित राज्यांच्या बसेसना महाराष्ट्रात येऊ द्यावे. त्या बसमधून ते प्रवासी त्यांच्या राज्यात जातील. मात्र, असे करणेही खूप जिकीरीचे ठरणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेस आल्या तर धोक्याचे ठरणार आहे. आता अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार