शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:10 IST

Who Will be PM Modi's Successor: शिवसेना (उद्धव बाळासाहब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला आहे.

PM Modi's Successor: पंतप्रधाननरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक असलेल्या वर्षप्रतिपदा (गुढी पाडवा) उत्सवानिमित्त रविवारी नागपुरातील संघ कार्यालयात पोहोचले होते. येथे त्यांनी संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर ते संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. दरम्यान, त्यांच्या या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र यासंदर्भात, भाजप अथवा संघाने अधिकृतपणे कसलेही भाष्य केलेले नाही. राऊत प्रत्रकारांसोबत बोलत होते.काय म्हणाले राऊत? -यावेळी, मोदींचे वारसदार कोण असतील? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, "यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्णय घेईल, असे दिसते. यावर, मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळेल? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, यामुळेच मोदींना काल बोलाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच, संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात, ते स्पष्ट आहेत. पुढचा नेता संघ ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल." पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, " जी माहिती बाहेर येत आहे, ती स्पष्ट आहे की, सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जे धोरण जाहीर केले आहे की, 75 वर्षं झालेल्या व्यक्तीने सत्तेच्या कोणत्याही पदावर राहू नये. यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या भूमिकेची अथवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा केली. की आता आपली वेळ आली आहे. सप्टेंबर महिना येतो आहे. तेव्हा देशाचे नेतृत्व बदलावे लागेल. 

याशिवाय, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भातही संघाची एक भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी, ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दसते. ज्या अर्थी पंतप्रधान मोदींना 10-11 वर्षांनंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले, ही काही साधी गोष्ट नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान