शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोण अपात्र?; शिंदे-ठाकरेंच्या या ३० आमदारांचीही धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 09:34 IST

दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत.

Shivsena MLA Disqualification ( Marathi News ) : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण या निकालाचा दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नक्की कोणत्या गटाला अपात्र करणार की अन्य काही निकाल देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपल्या समर्थक आमदारांसह आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाने शिंदे आणि समर्थक आमदारांना अपात्र करण्याची याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. यासंदर्भातील विविध तब्बल ३४ याचिकांवर मागील काही महिन्यांत झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या कालमर्यादेनुसार आज विधानसभा अध्यक्षांना आपला निकाल जाहीर करावा लागणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

  - अजय चौधरी  - भास्कर जाधव  - रमेश कोरगावंकर  -  प्रकाश फातर्फेकर   - कैलास पाटील  - संजय पोतनीस  - रवींद्र वायकर  - राजन साळवी  - वैभव नाईक  -  नितीन देशमुख  - सुनिल राऊत  - सुनिल प्रभू  - उदयसिंह राजपूत  - राहुल पाटील

शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?

 - एकनाथ शिंदे - भरत गोगावले - संजय शिरसाठ  - लता सोनवणे - प्रकाश सुर्वे - बालाजी किणीकर - बालाजी कल्याणकर - अनिल बाबर  - चिमणराव पाटील - अब्दुल सत्तार - तानाजी सावंत - यामिनी जाधव  - संदीपान भुमरे - संजय रायमूळकर - रमेश बोरनारे - महेश शिंदे

अपात्रतेसाठी दाखल ३६ याचिकांची ६ टप्प्यांत विभागणी

१. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेची केलेली मागणी२. सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका३. सुनील प्रभू यांनी योगेश कदम यांच्यासह शिंदे गटातील १८ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका४. सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका५. सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या याचिका६. व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेची मागणी करणारी भरत गोगावले यांची याचिका

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे