शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"दोन महिन्यात कोणाला फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:24 IST

Vijay Wadettiwar Criticize Eknath Shinde: बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत सांगून मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? महायुती  सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.

मुंबई - राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र  भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याचे सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांची पोलखोल केली आहे. त्याचबरोबर दोन महिन्यात कोणाला फाशी दिली त्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असेही  विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत सांगून मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? महायुती  सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत. 

हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? असा सवाल उपस्थित करत श्री. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूर बाहेरचे होते असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे.या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही. फक्त फेकाफेकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात महायुतीचे नेते पटाईत असल्याचे  म्हणत श्री. वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी