शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील कनिष्ठ अभियांत्याच्या खुर्चीत बसून कारभार सांभाळणारा व्यक्ती कोण?, कारवाई शून्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:36 IST

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात गोंधळ

उल्हासनगर : महापालिका नगररचना विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या खुर्चीत बसून चक्क एक अनधिकृत व्यक्ती कारभार हाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे महापालिकेच्या या वादग्रस्त विभागातील सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर महापालिका नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्या खुर्चीत  ऐक अज्ञात व्यक्ती बसून कारभार हाकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकाराने विभाग पुन्हा वादात सापडला. विभाग इमारत बांधकामाच्या परवानग्या आणि टीडीआर घोटाळ्यामुळे कायम चर्चेत राहिला असून काही टीडीआर शासनाने रद्द केले. यापूर्वी तत्कालीन नगररचनाकार याने स्वतः काही जण विभागात कामावर ठेवल्याचा प्रकार उघड झाला होता. कॅम्प नं-५ येथील झलक आणि खेमानी महापालिका शाळा परिसरातील एक इमारत थेट महापालिका रस्त्यावर येत असूनही तिला बांधकाम परवाना दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झाला. 

आयुक्तांच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विभागामध्ये असे अनधिकृत व्यक्ती काम करत असतील, तर नागरिकांच्या फाईल्स आणि महत्त्वाच्या निर्णयांची गोपनीयता व कायदेशीरता धोक्यात येऊ शकते. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी यापूर्वीही अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. आता या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्या कनिष्ठ अभियंत्यावर आणि संबंधित अनधिकृत व्यक्तीवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई कधी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक झलक आहे, नगररचना विभागातील संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Unauthorized person runs Ulhasnagar Town Planning, no action taken.

Web Summary : Ulhasnagar's Town Planning department faces scrutiny as an unauthorized individual is seen handling affairs in a junior engineer's chair. A viral video exposes potential breaches of confidentiality and legality. Citizens await the Commissioner's action on the engineer and the unauthorized person, urging a thorough investigation.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर