शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोण संदीप देशपांडे? कुठे असतात..?; हल्ल्यावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:30 IST

कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही असं राऊतांनी म्हटलं आहे.

मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ४ अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे आरोपी कोण आहेत याचा शोध पोलीस घेतील असं भाजपा नेते आशिष शेलारांनी म्हटलं तर कोण संदीप देशपांडे, कुठे असतात असं खोचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. 

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर कोण संदीप देशपांडे? कुठे असतात असं राऊतांनी विचारलं. राऊत म्हणाले की, मला हल्ल्याची माहिती नाही. कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. कुणीही असेल सामान्य माणूस असेल, राजकीय नेते असतील त्यांना धमक्या देणे, त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलणे अशाप्रकारे सनसनाटी निर्माण करणे त्यामुळे अशा हल्लेखोरांना बळ मिळते असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था अजिबात नाही. जिथे निवडणुका असतील तिथे कायदा सुव्यवस्था हातात घेऊन आपल्या सोयीनुसार गृहमंत्री तिथे जातात आणि संपूर्ण कायदा हातात घेऊन तो आपल्या पक्षासाठी राबवतात. पोलीस यंत्रणाही अशारितीने वागत असतील तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असा इशाराही संजय राऊत यांनी सरकारला दिला. 

ठाकरे कुटुंबीयांनी घेतली भेट सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर ४ अज्ञात इसमांनी हल्ला केला. क्रिकेटच्या स्टंम्पने हा हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडे यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यात देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर, पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही रुग्णालयात पोहचल्या होत्या. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसे