शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी द्यायला लावला? पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवले 'बोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:39 IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे.

महाविकास आघाडीत जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आग्रही होते. शिवसेनेसोबत जाण्यास विरोध करतील असे वाटले होते. परंतू तेच महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत होते, यावर देखील पृथ्वीराज यांनी खुलासा केला आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग २०१९ ला का केला? याचे उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली आहे.  

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. २०१४ मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतू आम्ही तेव्हा विचार केला नव्हता. मग आम्ही २०१९ ला का केला? याचे कारण ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे भाजपचे सरकार चालविले आणि भाजपाने विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, देशात विरोधी पक्ष संपवून टाका, असे वक्तव्य अमित शहांकडून झाले त्यामुळे हा विचार केला. अल्पसंख्यांक नेत्यांनीही आम्हाला महाविकास आघाडीत जाण्यास सांगितले. य़ामुळे मी पुढाकार घेतला. दिल्लीत सोनिया गांधींचे मन वळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. काही घटना घडल्या त्यामुळे सरकार पडले, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्यातील सरकार प़डले त्यात आमचीही काही चूक होती. काही गोष्टी घडायला नको होत्या. अध्यक्षपद खूप महत्वाचे होते. त्यामुळे आमच्यातल्यांचा गोंधळ काही बरोबर नव्हता, असे म्हटले. यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले, या मुद्द्यावर छेडले असता यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

नाना पटोलेंना राजीनामा का द्यायला लावला, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राजीनामा प्रदेशाध्यक्षपदासाठी द्यायला लावला हे स्पष्ट होते. त्यांना कोणी द्यायला लावला, या राजकारणावर मला बोलता येणार नाही, परंतू यामुळे दोन्ही मित्रपक्ष दुखावले गेले. इतक्या मोठ्या पदावर निर्णय घेताना सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा होता. एकतर्फी निर्णय घेता नये. त्यामुळे पुढचे राजकारण घ़डले, असे चव्हाण म्हणाले. 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नको होता. मी स्पष्ट बोललो होतो. त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायला हवे होते. मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, परंतू मला कोणी विचारले नाही, यामुळे सल्ला देण्याचा प्रश्न आला नाही. आता जे घडले तो इतिहास झालाय, पुढच्या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढवाव्यात. जागा वाटपात कुरबुरी होईल, परंतू महाराष्ट्राच्या हितासाठी विषारी विचारांच्या प्रवृत्तीला दूर ठेवले पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र येऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस