शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
3
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
4
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
5
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
6
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
7
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
8
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
9
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
10
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
11
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
12
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
15
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
16
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
17
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
18
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
19
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
20
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 06:43 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली.

मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी वारंवार मागणी करणारे उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घुमजाव करीत वेगळी भूमिका मांडली. महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो, असे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली.

कुणाचेही नाव जाहीर करा, पण मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी लगेच पाठिंबा देतो, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी अलिकडे जाहीरपणे केली. मात्र रविवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदावर तशी भूमिका घेण्याचे टाळले. महायुती गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का? हे जाहीर करावे, असे उद्धव म्हणाले. या सरकारची गच्छंती हे आमचे प्रमुख ध्येय आहे, आमच्यासाठी मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्याच्या जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार आणि पटोले यांनी व्यक्त केली.

‘गद्दारांचा पंचनामा’ पुस्तिकेचे प्रकाशन राज्यातील महायुती सरकारच्या काळातील कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँडस एन्डमध्ये मविआच्या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.     - सविस्तर/७

महायुतीच्या काळात प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्तसरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण किती निर्णयांची अंमलबजावणी होईल? महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण या सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्धवस्त झाली, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्धवस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.

मविआत नेतृत्वाचा प्रश्न नाही : शरद पवारहरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील जनता बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. विधानसभेलाही तसेच परिणाम येतील. मविआत नेतृत्वाचा प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुद्ध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे पवारांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले