शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

''कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरविण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 21:10 IST

कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत.

मुंबई - मनसेच्या कार्यकर्त्यांनी  मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत  ठिकठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण करून दादागिरी करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व येथील फेरीवाल्यांची भेट घेतली. यावेळी संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे फेरीवाल्यांना धमकी देतात. त्यांचे फालतू कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांना हुसकावून लावतात. हे भ्याडपणाचे लक्षण आहे. पोलिसही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करत नाहीत. नुसते अटक केल्याचे नाटक करतात. कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. काही ठिकाणी पोलीस सुद्धा मारून फेरीवाल्यांना जबरदस्तीने हुसकावून लावते. अशी सुद्धा तक्रार फेरीवाले करत आहेत. माझे मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना सांगणे आहे की अशा फालतू लोकांना घाबरण्याची काहीही गरज नाही. काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या पाठीशी आहे. फेरीवाला कायदा आपल्या देशात आहे. तो लागु करण्यात सरकार अपयशी ठरते हा सरकारचा दोष आहे. माझे मुंबईतील पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की जर मनसेचे फालतू गुंड निरपराध फेरीवाल्यांना त्रास देत असतील त्यांच्यावर जुलूम करत असतील तर त्यांना संरक्षण देणे पोलिसांचे काम आहे. जर मनसेचे गुंड फेरीवाल्यांना असाच त्रास देत राहिले आणि पोलिसांनी मनसेच्या फालतू गुंडांवर त्वरित कठोर  कारवाई केली नाही, तर सर्व फेरीवाले कायदा हातात घेण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. काँग्रेस पक्ष त्यांच्या बरोबर उतरून आंदोलन करेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत आझाद हॉकर्स युनियनचे जय सिंह आणि अनिस फातिमा शेख, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे