शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:04 IST

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील असं किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई - संजय राऊतांवर आधीही गुन्हा झाला आहे. मेधा सोमय्यांवरील मानहानीची सुनावणी सुरू झालीय. स्वप्ना पाटकर, पत्राचाळ घोटाळा यात कारवाईला सुरुवात झालीय. आणखी वसई-विरारचा घोटाळा, परदेश दौरा, दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण भेटलं होतं. कुठला बिल्डर होता आणि कुठल्या देशातून आला होता. जेव्हा हे सगळं बाहेर येईल तेव्हा नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यात स्पर्धा सुरू होणार असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील. दापोली कोर्टात अनिल परब यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची याचिका दाखल झाली आहे. १७ ऑगस्टला त्यावर निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरेंकडे नसलेल्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे. शिंदे-फडणवीस राज्यात मजबूत सरकार चालवत आहेत. दबावामुळे संजय राऊतांवर कारवाई होत नव्हती. स्वप्ना पाटकर यांच्यावर दादागिरी, धमक्या देणे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच संजय पांडे यांच्या माफियागिरीने संजय राऊत यांच्यावरील गुन्हे दडपले होते. उद्धव ठाकरेंकडे आमदार, खासदार किती हेच त्यांना माहिती नाही असा टोलाही सोमय्यांनी लगावला. 

महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न संजय राऊतांना अटक केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. याचदरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. 

ते पैसे शिवसैनिकांच्या अयोध्या दोऱ्याचेसंजय राऊत यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण बनावट आहे. ईडीजवळ संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याशी संबंध असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. ईडीला जे ११.५ लाख रुपये सापडले आहे ते शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठीचे आहेत. त्या पैशांवर एकनाथ शिंदे अयोध्या टूर असंही लिहिण्यात आले होते. संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर केले जाईल. राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. ईडीने रविवारी राऊतांच्या घरी छापेमारी केली. यावेळी त्यांच्या घरातून ११.५ लाख रोकड जप्त करण्यात आली. ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी शिवसेना आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे