शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अब की बार... शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवणार शरद पवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:16 PM

शिवसेना आणि भाजपा महायुतीमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई - शिवसेना आणि भाजपा महायुतीमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका निर्णयक ठरणार आहे. मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेने दावा केला असला तरी त्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेला मिळणारे मुख्यमंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शरद पवार यांच्या मर्जीनुसारच निश्चित होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा न सुटल्याने भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.शिवसेनेने दिवसागणिक अधिकच ताठर भूमिका घेतल्याने अखेरीस भाजपाने आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचा निरोप राज्यपालांना दिला होता. त्यानंतर राज्यापालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष पाठिंबा देतील की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस थेट सत्तेत सहभागी होईल, तर काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, असे बोलले जात आहे. राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीही शरद पवार हेच निश्चित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांना विधिमंडळातील फारसा अनुभव नसल्याने त्यांच्या नावाला शरद पवार हे अनुकूल असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पवार यांच्याकडून सहमती मिळण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे