मुंबईसारख्या शहरात स्वत: चे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ५ हजार ६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. या लॉटरीसाठी इच्छुक लोक येत्या १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. दरम्यान, म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतो? याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेकजण म्हाडाच्या लॉटरीपासून वंचित राहतात.
म्हाडा आणि सिडको सारख्या सरकारी संस्थांनी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली आहेत, ज्यामुळे दरवर्षी हजारो अर्जदार या योजनांकडे आशेने पाहतात. अलीकडेच, कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने ठाणे शहर आणि जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरीची घोषणा केली आहे. या लॉटरीसाठी १४ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिक या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात.
म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकते? म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शिवाय, अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. दरम्यान, कोणत्या गटासाठी किती उत्पन्न किती असावे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
गट | उत्पन्न (दरमहा) |
अत्यल्प | २५००० रुपये |
अल्प | २५,००१ रुपये- ५०,००० रुपये |
मध्यम | ५०,००१ रुपये- ७५,००० रुपये |
उच्च उत्पन्न | ७५,००१ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक |
महत्त्वाची माहिती- म्हाडाच्या या लॉटरीसाठी १३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.- १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख आहे.- २१ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पात्र लोकांची पहिली यादी जाहीर केली जाईल.- अर्जदार २५ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत दावे आणि हरकती दाखल करू शकतात.- १ सप्टेंबर २०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पात्र लोकांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.- ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरीचा ड्रॉ काढण्यात येईल.