शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:33 IST

कोल्हापुरात शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट सवाल केला आहे.

Dhananjay Munde on Sharad Pawar : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. महायुती सरकारच्या धोरणावर टीका करताना राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. योजनांचा थेट लाभ देणारे हे सरकार तुम्हाला घालवायचे आहे का थेट सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मंगळावारी कोल्हापुरात कागल येथे भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष केलं. शरद पवारांनी भाषण करताना अजित पवार गटासह महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. "संकटकाळी साथ देण्याची जबाबदारी असताना लाचार होऊन दुसऱ्यांच्या दारात जाऊन बसलेल्या या नेत्याला जागा दाखवा. शेतकरी हिताची जपणूक करण्याची जबाबदारी केंद्राची असताना त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकारचे शेतकरी, कष्टकरी, तरुणांना उद्ध्वस्त करणारे धोरण आहे. राज्यात भगिनींचा सन्मान नव्हे तर अत्याचार सुरू आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या हातात सत्ता देऊ नका, राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे," असं शरद पवार यांनी म्हटलं.  

शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला. धनंजय मुंडे सध्या मराठवाड्यातील  नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम हे सरकार करत आहे, मग हे योजनांचा थेट लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

"सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, किंवा शेतकऱ्यांचा पिक विमा असेल, शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल, तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे. अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला का घालवायचे आहे," असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुतीचीच आहे, मात्र जेव्हा महायुतीतील घटक पक्ष पक्षाचा प्रचार करतात तेव्हा पक्षाच्या चौकटीत बसून योजनेबद्दल प्रचार केला जातोय. याबद्दल दुसरं कुठलंही मत काढण्याचे आवश्यकता नाही," असेही धनंजय मुंडेंनी म्हटलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार