शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

...तर नागपूरला विधानभवनाला घेराव घालणार, धनगर आरक्षणावरून गोपिचंद पडळकर आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 22:56 IST

Gopichand Padalkar: धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा काढत आहेत. यादरम्यान, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा काढत आहेत. यादरम्यान, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही लोक आपल्या आरक्षणाला विरोध करतात, परंतु मुळात डॉ. आंबेडकरांनी आधीच आम्हाला आरक्षण दिलेले आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे, सरकार सोबतच्या बैठकीनंतर ६० दिवस पूर्ण होऊनही काही कारवाई झाली नाही, तर येत्या २१ नोव्हेंबर रोजी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसिलदारांसमोर एक मोर्चा काढायचा आहे आणि ११ डिसेंबरला  महाराष्ट्रातला धनगरांचा नागपूरला विधानभवन घेरण्यासाठी अधिवेशन काळात जायचं आहे,असे पडळकर यांनी म्हटले आहे. 

गोपिचंद पडळकर म्हणाले की, मागील पंधरा दिवसांआधी जेंव्हा मी धनगर जागर यात्रा घोषित केली तेंव्हा पासून आपल्यात कशी फुट पाडतां येईल, याचे सर्व प्रयत्न महाराष्ट्रातला एक लांडगा करतोय. काही लोक आपला आरक्षणाचा विरोध करतात, परंतु मुळात डॉ. आंबेडकरांनी आधीच आम्हाला आरक्षण दिलेले आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे.

हे किती बहुजन विरोधी आहेत, हे यावरूनच सिद्ध होते की, काकाच्या विरोधात बंड केले पुतण्याने, पण टार्गेट व शिव्याशाप दिले जाताहेत छगन भुजबळांना. का? कारण ते माळी समाजातील आहेत म्हणून का? आधी त्यांनी उभारलेली समता परिषदेवर संपवण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेब हे मुख्यमंत्रिपदाच्या एकदम जवळ असताना यांनी कट कारस्थान करून एक आमदार पळवण्यास सर्वात मोठी भूमिका बजावली होती. नाहीतर त्याचवेळेस वंजारी समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता. नंतर बी. के कोकरे साहेबांनी उभारलेली चळवळ यांनी संपवली. म्हणजे काय तर बहुजनांचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचंच नाही, असा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केला.

गोपिचंद पडळकर पुढे म्हणाले की, बी,के कोकरेंनी यशवंत सेनेची स्थापना पवारांच्या विरोधात लढण्यासाठी स्थापन केली होती. ती बी के कोकरेंची यशवंत सेना पवारांच्या सांगण्यावरून पावले उचलतेय. याचे मला अतिशय दुख वाटतेय, वेदना होतेय. आपल्या लोकांना हे केंव्हा समजेल की आपला वापर आपल्याच समाजात फुट पाडण्यासाठी होतोय. याची जाणीव यांना व्हावी हीच प्रार्थना श्री खंडोबा बिरोबाच्या चरणी करतो, असेही पडळकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा