शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:20 IST

बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणलं जात असल्याचा आरोप

मुंबई : जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम हटवल्याबद्दल पेढे वाटले जात आहेत. मात्र, देशातील ३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार करून जनमताशी प्रतारणा केली, यावर कोणी बोलायला तयार नाही. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. कोणी कितीही संताप व्यक्त केला व कितीही टीका केली, तरी ते निवडून येणार आहेत, याचा त्यांना विश्वास आहे हा सत्तेचा माज आहे. भाजप सोडून राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्र जरी आले, तरी भाजपच जिंकणार. कारण ईव्हीएम मशिन भाजपच्या ताब्यात आहेत, असा आरोप त्यांनी केला. बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणले जात आहे, असेही ते म्हणाले.ईव्हीएम हटवण्याबाबत मी दिल्लीत निवडणूक आयोगाची, सोनिया गांधींची व ममता बॅनर्जींची भेट घेतली. त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे, याची माहिती दिली. त्यांनीही हा धोका मान्य केला व या मुद्द्यावर सोबत असल्याची ग्वाही दिली. मला ईडीची नोटीस आल्याचे वृत्त निराधार आहे, असे ते म्हणाले. मोदींच्या शिक्षणाबाबत माहिती मागितल्याने माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. माहिती कायद्यावर सरकारी अंकुश आणणारा कायदा केला गेला, असे ठाकरे म्हणाले.एका व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा कायदा करण्यात आला. सामाजिक किंवा राजकीय आंदोलन केल्यास त्याला दहशतवादी ठरवून अटक करण्याचे आदेश अमित शहांना मिळाले आहेत. बहुमत असल्याने काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचे म्हणून इंटरनेट बंद करण्यात आले. जमावबंदी लागू करण्यात आली. भविष्यात महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ यांच्याबाबतीत घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.जेट एअरवेज बंद पडली, एअर इंडिया तोट्यात गेली, बीएसएनएलला ५४ हजार कोटींचा तोटा झाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशातील वाहन क्षेत्र प्रचंड अडचणीत असून, त्यामुळे किमान १० लाख कुटुंबे अडचणीत येण्याची भीती आहे. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात १४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सुमारे सहा लाख मध्यम उद्योग बंद पडले आणि हे सर्व एका माणसाला नोटाबंदीचा झटका आल्याने झाल्याची कडवट टीका राज यांनी केली.३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले. पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, जिथे ३७० कलम नाही. मग तिथे गेल्या पाच वर्षांत रोजगार का निर्माण करू शकला नाहीत, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये, म्हणून समान नागरी कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून नागरिकांचे लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या जोरावर मतदान फिरविल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुका, २०१७ च्या महापालिका निवडणुकांत मनसेचा जो निकाल समोर आला, तो मान्य नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे काही खासदार भाजपला मंत्री म्हणून नको होते नेमके त्यांनाच पाडले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.इव्हीएमविरोधी मोर्चा पूरस्थितीमुळे ढकलला पुढेदेशातील निवडणुका फक्त मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, या मागणीसाठी २१ तारखेला काढला जाणारा मोर्चा पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आला आहे. त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे