शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"पहाटे झाले ते संध्याकाळी होईल, १० आमदार बोलले; पवार यांच्यासोबतच्या बैठकीतूनच शिंदे कॅम्पमध्ये फोन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 13:48 IST

 राऊत म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणे झाले. ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील. जे पळाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. 

मुंबई : शरद पवार, अजित पवार हे नेते शुक्रवारी सायंकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला आले, तेव्हा तिथूनच एकनाथ शिंदे यांच्याकडील दहा आमदारांशी आमचे बोलणे झाले, ते यायला तयार आहेत, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. पहाटेचा शपथविधी टिकला नव्हता, जे पहाटे झाले तेच सायंकाळी होईल, असा टोलाही त्यांनी हाणला.  राऊत म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणे झाले. ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील. जे पळाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरीसारखे का पळता? या पळून गेलेल्या आमदारांवर ११ कोटी जनतेचा अविश्वास आहे, असा टोलाही राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झाले ना ते आता सायंकाळी होईल, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये. भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत.  जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आमचे आम्ही बघून घेऊ, तुम्ही मधे पडू नका, असेही राऊत म्हणाले.

शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदारएकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. २०१९ साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहिती आहे. जर २०१९ साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असते, असेही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार