शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Funeral: अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे-कुठे ठेवले जाणार? उद्या सकाळी ११ वाजता अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:36 IST

Ajit Pawar Funeral Cremation Time: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२९ जानेवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव दोन ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. 

Ajit Pawar Final Rites: बुधवारची सकाळ महाराष्ट्रासाठी बारामतीमधून एक वाईट बातमी घेऊन आली. बारामतीमध्ये पोहोचत असतानाच काळाने झडप घातली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. धावपट्टीच्या बाजूलाच विमान कोसळले आणि प्रचंड मोठ्या स्फोटात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यु झाला. त्यांच्या निधनाची वार्ता येताच राज्यभरातून लोकांची रिघ बारामतीत येण्यास सुरुवात झाली असून, त्यांच्या पार्थिवावर २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. 

विद्या प्रतिष्ठाण आणि काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवणार पार्थिव

सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हा अपघात घडला. अजित पवारांचा मृतदेह अपघातस्थळावरून बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला. त्यामुळे रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली. त्यानंतर अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दोन ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. रात्री सव्वा सात वाजता पार्थिव रुग्णालयातून मैदानात नेण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत हे पार्थिव इथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारी (२९ जानेवारी) रोजी सकाळी ६ ते ९ वाजेच्या काळात अजित पवारांचे पार्थिव काटेवाडी इथे ठेवण्यात येणार आहे. 

त्यानंतर त्यांचे पार्थिव परत विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात येणार असून, ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राजकीय, उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं सांत्वन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधन झाल्याचे वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. दुपारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे हे बारामतीत पोहोचले आणि त्यांनी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले. 

एक कर्तृत्ववान नेता हरपला -शरद पवार

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी आपल्या दुःख भावना व्यक्त केल्या. "हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये", अशी विनवणी शरद पवारांनी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's body: Viewing locations and funeral details revealed.

Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. His body will be available for public viewing at Vidya Pratishthan and Katewadi before his state funeral at 11 AM. Three days of mourning declared.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीAccidentअपघातDeathमृत्यू