शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग रेटला जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे स्पष्ट

By समीर देशपांडे | Updated: June 21, 2024 18:53 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा 

कोल्हापूर : एकीकडे नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी ट्विट करत शक्तिपीठ महामार्गाला ज्या ठिकाणी विरोध आहे तेथे फेरआखणी केली जाईल असे स्पष्ट केल्याने सरकार हा प्रकल्प रेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून पुन्हा वातावरण तापणार असून कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांना बंदी घालण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधात मोर्चे निघाले असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग रद्दच करण्याची जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री दादा भुसे यांनी या प्रक्लपाला स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर स्थगिती नको शक्तीपीठ रद्दच करा अशी मागणी करत लोकप्रतिनिधींनी शासनाला धारेवर धरले. अशातच आता मुख्यमंत्री शिंदे यांचे ट्विट आगीत तेल ओतणारे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विट असे म्हटले आहे की,  हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.दरम्यान, यानंतर आता संघर्ष समिती आक्रमक झाली असून मंत्र्याना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करणार असल्याची घोषणा कॉ. गिरीश फोंडे यांनी केली आहे. हे सरकार पाडण्यासाठीच प्रयत्न करणे हाच यावरचा उपाय असल्याचेही त्यांनी आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे