शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएच्या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदेंना कुठे स्थान? पहिला फोटो आला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 19:03 IST

एनडीच्या बैठकीला ३० पक्षांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. जवळपास १०० च्या वर नेते उपस्थित आहेत. पण महाराष्ट्रातील नवे पक्ष कोणत्या रांगेत?

एकीकडे मोदी सरकारविरोधात विरोधक मोट बांधत असताना दुसरीकडे भाजपानेही शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरु झाली आहे. विरोधकांच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे तर मोदींच्या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे असे काहीसे चित्र दिसत आहे. असे असताना दिल्लीत शिंदे-पवार यांना एनडीएच्या या मेगा बैठकीत कुठे स्थान देण्यात आले याची चर्चा सुरु झाली आहे. 

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला दिल्लीतील हॉटेल अशोका येथे सुरुवात झाली आहे.  या बैठकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेले देशभरातील 38 पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. यावेळी या सर्व पक्षांच्या प्रमुखांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या वतीने तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने उपस्थित आहेत. एनडीच्या बैठकीला ३० पक्षांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. 

असे असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोदी आणि अमित शाह यांनी आपल्याच रांगेत बसविले आहे. शाह यांनी एकनाथ शिंदेंना एका बाजुला आणि पवार यांना दुसऱ्या बाजुला बसविले आहे. शिंदेंच्या बाजुला नड्डा आणि त्यांच्या बाजुला मोदी बसलेले आहेत. यामुळे एनडीएच्या बैठकीत शिवसेना जुना मित्र असला तरी नव्याने दाखल झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महत्व देण्यात आले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह