शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे? पाच राज्यांमधील निवडणुकांपासून दूर ठेेवले की दूर राहिले? चर्चा जाेरात

By यदू जोशी | Updated: November 28, 2023 07:09 IST

Assembly Election 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला प्रचारापासून भाजपने दूर ठेवले की राष्ट्रवादीने अंतर राखले, हा सध्या चर्चेचा विषय आहे. 

- यदु जोशीमुंबई - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते प्रचाराला उतरले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला प्रचारापासून भाजपने दूर ठेवले की राष्ट्रवादीने अंतर राखले, हा सध्या चर्चेचा विषय आहे. 

शिंदे हे राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचाराला जाऊन आले. ते मंगळवारी तेलंगणामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. त्यांच्या पक्षाचे मंत्री संजय राठोड हे या आधीच तेलंगणामध्ये आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा प्रचारासाठी भाजपला उपयोग करवून घेता आला असता. महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांमध्ये त्यांचा फायदाही झाला असता,  पण केंद्रीय भाजपने त्याबाबत विचार केला नाही, असे दिसते. 

मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या वीस-वीस आमदारांना दोन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही नेते गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सभा घेतल्या. 

भाजपचे नेते म्हणतात... - महाराष्ट्र भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, प्रचार मोहिमेत कोणाला सामावून घ्यायचे, याचा पूर्णत: निर्णय दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होतो. - आम्हाला आदेश येतात त्यानुसार आम्ही अन्य राज्यांमध्ये पक्षाच्या नेत्यांना पाठविण्याबाबतचे नियोजन करत असतो.- मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सभा, प्रचार दौरे यांचे नियोजनदेखील दिल्लीतून केले जाते. 

राष्ट्रवादीचे नेते म्हणतात... राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याला याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षाने या पाचपैकी कोणत्याही राज्यात उमेदवार उभे केलेले नाहीत. आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत.  साधारणत: मित्रपक्षांची प्रचारात मदत घेताना कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे तशी विनंती केली जाते. आम्हाला या निवडणुकीतील प्रचाराबाबत भाजपकडून विचारणा झालेली नव्हती.

काँग्रेसनेही मित्रपक्षांना केली नव्हती विनंती महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे आणि तिन्ही पक्ष हे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. मात्र, आपल्या मित्रपक्षांना प्रचाराची विनंती काँग्रेसकडून करण्यात आलेली नव्हती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा