शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 11:29 IST

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबत केलेल्या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आज संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसलेइंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबतच्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, ''इंदिरा गांधींबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे.  जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. मी केलेल्या त्या विधानाबाबत म्हणायचे तर करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठाणांच्या समस्यांबाबत ते इंदिरां गांधींना भेटले होते.'' 

दरम्यान, ''पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे. जेव्हा कधी इंदिरा गांधींवर टीका झाली तेव्हा मी त्यांना पाठिंबा दिला आहे.''असे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, छत्रपतींच्या वंशजांबाबत केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही.'' 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी