शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुमची भूक नेमकी भागणार तरी कधी ? राजू शेट्टी विचारणार मुकेश अंबानींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 17:59 IST

राज्यातील शेतकरी संघटना मुंबईतील अंबानी इस्टेटवर धडकणार

ठळक मुद्देसरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही

पुणे : गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला आहे. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केला. तसेच गोर गरीब शेतकऱ्यांचे व्यवसाय घेऊन बड्या उद्योजकांची भूक नेमकी भागणार तरी कधी आहे, याची विचारणा करण्यासाठी मुंबईतील अंबानी इस्टेटवर राज्यातील शेतकरी संघटना मंगळवारी  (दि.२२) धडक मोर्चा काढणार आहे, असे त्यांनी सांगितले.    पुण्यात बुधवारी (दि. १६) झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ  कामगार नेते डॉ. बाबा आढावा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, प्रतिभा शिंदे, राजूल पोकळे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते. 

शेट्टी म्हणाले , केंद्राने मंजूर केलेले तिन्ही कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द व्हावेत. तसेच उसाचा एफआरपी कायदा सर्व पिकांना लागू करावा. हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागण्या आहेत. सर्व शेतकरी संघटना एक होऊन लढत आहेत. भाजपाच्या शेतकरी संघटना देखील त्यांच्या बाजूने बोलत नाही. तरीही मोदी का अडून बसले आहेत. सरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. सरकारला हे आंदोलन दडपायचे आहे. तसेच शेतीच्याबाबत कंपन्यांचे खाजगीकरण करणे सुरू आहे. शेतकऱ्यांना लुटून खायचे धोरण या सरकारचे आहे. यात जे शेतकरी हुतात्मा झाले आहेत त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. सर्व शेतकऱ्यांनासोबत घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे. असे शेट्टी म्हणाले. 

शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी हे कृषी विधेयक आणले आहे. त्यांच्यातील अंबानी यांची तर जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत नाव घेतलॆ जाते. आम्हाला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, बाबा नेमकी तुझी भूक भागणार तरी कधी आहे ? हे एकदाचे सांगून तरी टाक. डॉ. आढाव म्हणाले की, मोदींनी शेतकऱ्यांची जबाबदारी झटकली आहे. तशी हमीभावाची जबाबदारी उद्योजकांवर ढकली आहे. शेतकरी आंदोलनकर्त्याना तुरुंगात टाकणार आहेत अशी त्यांची लक्षणे दिसत आहेत. यात जुने जे कायदे आहेत ते रद्द करा असे म्हणत आहेत. यात दोष जुन्या कायद्याचा नसून केंद्राच्या नाकर्तेपणाचा आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीMukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसायGovernmentसरकारFarmerशेतकरी