शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
6
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
7
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
8
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
10
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
11
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
12
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
13
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
14
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
15
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
16
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
17
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
18
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
19
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
20
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?

By दीपक भातुसे | Updated: April 22, 2025 07:38 IST

अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी  रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे. 

दीपक भातुसे

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच, ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र, अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.   

१३ लाखांवर महिला ठरल्या अपात्र 
२८ जून २०२४ रोजी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे २.५ कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर १३ लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी  रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे. 

या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही.   

अद्याप हालचाल नाही
राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली. अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. - अदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना