शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:23 IST

Ladki Bahin Yojana May 2025 Installment: लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. ही योजना बंद होणार नाही, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana Update:महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते. तेव्हाच पैसे थकवले होते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही. मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. 

कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ऊस तोड महिलांच्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, ही गंभीर बाब आहे. यावर तोडगा काढला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे.

 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWomenमहिला