शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

By admin | Updated: June 13, 2014 03:06 IST

या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.

रमाकांत पाटील, नंदुरबारसरदार सरोवर प्रकल्पाची १७ मीटर उंची वाढविण्यास नर्मदा प्राधिकरण नियंत्रणाने मंजुरी दिल्याने एकीकडे गुजरातमध्ये आनंदोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बुडीत कुटुंबांवर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही प्रमाणात विजेचा लाभ मिळणार असला तरी एक हजार कुटुंबांचे पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र आज तरी कोणाकडे नाही.वादविवादाचे अडथळे पार करून १९७९ मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, पण प्रत्यक्षात १९८८ मध्ये कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या उंचीबाबत प्रश्न-प्रतिप्रश्न उपस्थित झाल्यानंतर १३८ मीटर त्याची उंची निश्चित करण्यात आली. तथापि, पुनर्वसनाचा प्रश्न तसेच पर्यावरणाची हानी याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने आपली भूमिका सातत्याने लावून धरली. हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पाचे काम टप्प्या-टप्प्याने सुरू राहिले. आता अंतिम मंजुरी अर्थात धरणाचे दरवाजे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे.सरदार सरोवर प्रकल्पामुळे १४५० मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज निर्मिती प्रकल्पाचे ११० मीटर उंचीनंतर अर्थात २००१ पासून सुरू झाली असली तरी ती पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत नाही. लवादाच्या निर्णयानुसार या वीज निर्मितीपैकी २७ टक्के म्हणजे ३९२ मेगावॅट वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या सरासरी क्षमतेच्या जेमतेम ४० टक्के वीज निर्मिती होते. सध्या महाराष्ट्राला सरदार सरोवर प्रकल्पाची सरासरी ४० ते ११० मेगावॅट वीज मिळते. उंची पूर्ण झाल्यानंतर ती ३५० ते ३९२ मेगावॅटपर्यंत मिळेल, असा नर्मदा विकास विभागाचा दावा आहे.