शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मदत केव्हा भेटनजी? उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 03:04 IST

राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : पावसाने दिवाळीत दिवाळ काढलं. उभा धान आडवा झाला. कडप्याले अंकुर फुटले. आता साहेब लोक बांधावर येतात. काही तरी लिहून नेतात. पण आम्हा कास्तकऱ्याले मदत केव्हा भेटनजी, असा आर्त सवाल लाखनी तालुक्यातील मांगली येथील महिला शेतकरी शिला मासुरकर यांनी केला.दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पीक मातीमोल केले. शेतात उभा धान आडवा पडला. कापणी झालेला कडपा पावसात ओला होवून त्याला अंकुर फुटत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात धानापासून फुटकी कवडीही येण्याची आशा नाही. सर्वांच्या नजरा लागल्या आहे त्या शासनाच्या मदतीकडे. सर्वाधिक नुकसान लाखनी तालुक्यात झाले. संपूर्ण भात पीक उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे.

परंतु जोरदार पावसात कडपा सडला असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. जमिनीवर झोपलेल्या धानाला अंकुर फुटत आहे. बाजारात या काळ्या धानाला कोणतीही किंमत येणार नाही. संपूर्ण हंगामच शेतकºयांच्या हातून गेला. लाखनी तालुक्यातीलच पालांदूर येथील भोजराम भेदे सांगतात, मोठ्या आशेने बारा एकरात धान लावला. परंतु या पावसाने चार एकर शेत उद्ध्वस्त झाले असून उर्वरित पिकातूनही काही हाती येण्याची आशा नाही. आता आम्ही जगावं कस. शासनाने तात्काळ मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेताच्या बांधावरआता राजकीय पुढाºयासह विविध विभागाचे अधिकारी येत आहेत. धीर देत आहेत. परंतु नेमकी मदत केव्हा मिळेल हे कुणीही सांगत नसल्याने शेतकºयांमध्ये संताप दिसत आहे.मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे!

संजय वाघ नाशिक : भात लागवडीसाठी व्यापाºयाकडून घेतलेली उचल, पीक जगविण्यासाठी घेतलेली महागडी खते आणि मशागतीसाठी मजुरीवर केलेला खर्च निसर्ग कोपल्यामुळे डोळ्यादेखत मातीमोल झाला. कापणी होऊन पाण्यात भिजत पडलेला भात आता केवळ कचरा बनून शेतात उरल्याने सावकाराचे कर्ज आणि नऊ जणांच्या कुटूंबाच्या गुजराणीचा मेळ कसा घालावा हा एकच सवाल आडवण गावातील शेतकरी वामन नारायण शेलार यांना अस्वस्थ करीत आहे.मुंबई-आग्रा महामार्गापासून पाच ते साडेपाच किमी अंतरावर आडवण हे इगतपुरी तालुक्यातील गाव. सर्वाधिक भात उत्पादनात तालुक्यात दुसºया क्रमांकाचे आणि प्रयोगशील म्हणून या गावाचा लौकीक आहे. चिखल तुडवित शेलार यांचे शेत गाठले. शेतात कुजत पडलेल्या भाताची पेंडी हातात उचलून तिच्याकडे खिन्नपणे पाहत शेलार हे त्यांच्या कोमेजलेल्या स्वप्नाची कहाणी ऐकवित होते. अडीच एकर शेतात इंद्रायणी भातलागवडीसाठी व्यापाºयाकडून २५ हजारांची उचल घेतली. त्याच्या जीवावर काबाडकष्ट करून भात शेतात डौलदारपणे उभा केला. एक तारखेला भाताची कापणी केली आणि त्याच रात्री झालेल्या धुवॉँधार पावसाने पाणी फिरविले. भाताचे दाणे तर घराच्या उंबºयापर्यंत पोहचलेच नाहीत, उलट कापणी झालेला भात आता केवळ कचरा बनून शेतात भिजत पडला आहे. तो साफ करण्यासाठी त्यावर दहा ते बारा हजार रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. कर्ज आणि उदरनिर्वाह याचे गणित कसे जुळवायचे असे म्हणत आभाळाकडे हताशपणे पाहणाºया शेलार यांची अवस्था पाहून गझलकार आबेद शेख यांच्या ओळी आठवल्या...समजू नको ढगा रेसाधेसुदे बियाणे,मी पेरले पिलांच्याचोचीमधील दाणे...

राज्यात अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियम, शर्थींचा घोळ न घाला बांधावर जाऊन तातडीने मदत देणे गरजेचे असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी