शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:38 IST

Sonia Duhan News: शरद पवार गटाच्या दिल्लीतील फारयब्रँड नेत्या सोनिया दुहन ह्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सोनिया दुहन यांच्याबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का असा प्रतिप्रश्न केला.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यापासून राज्यात वेगवेगळ्या राजकीय उलथापालथी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पक्षाच्या दिल्लीतील फारयब्रँड नेत्या सोनिया दुहन ह्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सोनिया दुहन यांच्याबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का असा प्रतिप्रश्न केला.

यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. शरद पवार गटातील घडामोडी आणि सोनिया दुहन यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता आव्हाड यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का, असं विचारत एका वाक्यात विषय संपवला.

दरम्यान, शरद पवार गट सोडणार अशी चर्चा सुरू असलेल्या सोनिया दुहन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनातील नाराजी व्यक्त केली.  सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे शरद पवारांवर निष्ठा असणारे अनेक लोक आज पक्ष सोडून जातायेत. त्याचे उत्तर सुप्रिया सुळेंना द्यावे लागेल. अनेकदा शरद पवारांकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं, परंतु   शेवटी ती मुलगी आणि बाहेरचे, असे सोनिया दुहन म्हणाल्या. मी अजून पक्ष सोडला नाही. अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी कालच्या बैठकीला होते, मग असं पाहायला गेले तर जेव्हा पक्षात फूट पडली, आमदारांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे होत्या. मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? त्यामुळे मी अजून पक्षप्रवेश केला नाही. शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही. परंतु काही गोष्टी मला सर्वांसमोर आणायच्या आहे, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड