शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:24 IST

मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे.

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबई महापालिकेसोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा, अशी मागणी ठाकरेकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटला केला आहे.

"सभागृहाच्या बाहेर या सर्व गोष्टी आहेत. बीएमसीचे ऑडिट करावे, असे सांगितल्यानंतर ऐवढे झोंबायचे काही कारण नाही ना? मुंबईचे ऑडिट योग्य आहे की अयोग्य आहे. याची श्वेतपत्रिका आम्ही सरकार म्हणून जाहीर करणार आहोत. एवढ्या कश्याला मिर्चा झोंबल्या पाहिजेत. ज्यावेळी, पुणे, नागपूर, ठाणे, करायची असेल तेव्हा करू. कोव्हिड काळात जे घोटाळे झाले आहेत. ते आपल्यासमोर आहे, त्यावर मी शेरे मारलेले नाहीत. त्यामुळे कुठेही काही झाले तरी ही महानगरपालिका तपासा आणि ठाणे तपासा, अस म्हटलं जातंय. तर आम्ही तपासांच्यावेळी तपासू. जी आता तपासायचे ठरवलेले आहे. ते पहिले तपासू", असे उदय सामंत म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, "काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती काय आहे. कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार झालेले आहेत. यासंदर्भातील चौकशी केली जाईल. पुढच्या अधिवेशनात किंवा त्याआसपासमध्ये वाईट पेपर करण्याच्या निर्देश मी काल सभागृहात दिलेले आहेत."

दरम्यान, सरकारने मुंबई महानगरपालिकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा, सोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा. याशिवाय नगर विकास विभागाच्या गेल्या दीड वर्षांतील कारभाराचे आणि व्यवहाराचेही ऑडिट करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूरMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका