तिथे महिलांना काय किंमत मिळणार?

By Admin | Updated: January 21, 2017 01:25 IST2017-01-21T01:25:42+5:302017-01-21T01:25:42+5:30

महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.

What will the women get for the price? | तिथे महिलांना काय किंमत मिळणार?

तिथे महिलांना काय किंमत मिळणार?


सोमेश्वरनगर : महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. त्यामुळे जिथे ग्रामीण भागातील माणसालाच किंमत नाही तिथे महिलांना काय मिळणार आहे? असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि मराठी विभाग आयोजित लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललिता गादगे होत्या. चर्चासत्राचे उद्घाटन ग्रामीण लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. श्रीपती रायमाने, डॉ. जया कदम, प्रा. प्रवीण ताटे देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या ग्रंथाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशातील साहित्यिकांनी उपस्थिती दाखविली होती. प्रा. प्रवीण ताटे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राणी शेंडकर यांनी आभार मानले.
(वार्ताहर)
>..कमी तरतुदी
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सध्याच्या काळात शेतीपेक्षा इतर उद्योगांना महत्त्व वाढत आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या बजेटमध्येदेखील शेती उद्योगासाठी फारच कमी प्रमाणात तरतुदी केल्या जातात ही चिंतेची बाब आहे, असे सांगून इतिहासामध्ये काही मतभेद असतात म्हणून पुढच्या पिढीने मतभेद ठेवून जगायचं का? उपेक्षा ही गोष्ट व्यापक सामाजिक पटावर समजून घेण्याची बाब आहे. डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. ललिता गादगे, डॉ. जया कदम यांनी मनोगते व्यक्त केली.

Web Title: What will the women get for the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.