शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

"आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल?; हा लढा जनतेचा आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:13 IST

आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येते आणि याकडे इतर समाज ‘शेतकऱ्यांचा प्रश्‍न’ म्हणत दुर्लक्ष करत असेल तर ते या देशासाठी घातक आहे. आम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब जगवण्यापुरते पिकवले तर काय होईल? असा सवाल किसान आंदोलनातील एक प्रमुख नेते सरदार व्ही. एम. सिंग यांनी केला. ‘देशातील शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची ठरवली आहे. आणखी दोन वर्षे या आंदोलनाला भाजीभाकर पुरविण्याची ताकद लंगरमध्ये आहे,’ असे निर्धारात्मक उद्गारही त्यांनी काढले.

‘उत्तर प्रदेशातील करोडपती शेतकरी’ अशी व्ही. एम. सिंग यांची ओळख सांगितली जाते. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गाझियाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारबरोबर चर्चेच्या फेऱ्या करून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे सिंग यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा हा अवघ्या जनतेचा आहे. पण त्याकडे निव्वळ ‘शेतकऱ्यांचा विषय’ म्हणून बघणे चुकीचे आहे. अनेक पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले केंद्रातील बोलघेवडे सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाही. खासगी कंपन्यांना गालिचा अंथरणाऱ्यांना शेतकऱ्यांकडे यायला आणि त्यांचे प्रश्‍न समजून घ्यायलाही सवड नाही, हे दुर्दैव आहे. व्यवस्थेत निर्णयाचा अधिकार नसणाऱ्यांची टोळी चर्चेला पाठवून शेतकरी आंदोलकांची क्रूर चेष्टाच चालवली आहे. आंदोलकांचे हरेकप्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

तथापि, आम्हीं मागे हटणार नाही. आमच्या अनेक लेकरांनी त्यांचे शिक्षण बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. माता-भगिनींनीही शेत आणि घराची जबाबदारी स्वीकारून तिथली खिंड लढवली आहे. आमचे मनोबल वाढविण्यासाठी आम्हाला मिळणारी ही ऊर्जा पुरेशी आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेती