शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये तेव्हा काय चर्चा झाली होती? CM एकनाथ शिंदे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 20:14 IST

'मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो इच्छाशक्ती असावी लागते.'

सिल्लोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडंखोरी केल्यापासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच, शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, गेल्या काही काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले. 

'जनतेने युतीला निवडून दिले होते'सिल्लोडच्या जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, 'आम्ही शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. एकीकडे बाळासाहेबांचा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. हिंदुत्वाचा एक विचार घेऊन पुढे गेलो होतो. त्यामुळेच जनतेने भाजपचे 106 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकांची वक्तव्ये आली- आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती?' असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.

तेव्हा काय चर्चा झाली?यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, ती मला माहित नव्हती. पण, आता माझ्या भाजपच्या नेत्यांसोबत गाठीभेटी झाल्या, त्यात मला तेव्हाची बरीच माहिती मिळाली. अमित शहांनी मला सांगितले की, आमची कमीटमेंट फायनल असते. आम्ही तिकडे बिहारमध्ये कमी जागा आलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला अडचण नव्हती. आम्ही उद्धव ठाकरेंना शब्द दिला असता, तर तो पाळला असता. पण, आमचे तसे काहीच बोलणे झाले नव्हते.' 

'आघाडी करू नका असं आम्ही म्हणालो होतो'ते पुढे म्हणाले की, 'मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसं झालं नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं,' अशी माहिती शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाह