शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:32 IST

  पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची ...

 पुणे : काँग्रेसच्या लोकांनी लिहिणे, वाचणे सोडून दिले आहे, म्हणून त्यांना कळत नाही; पण नरेंद्र मोदींमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. ७० वर्षांत काँग्रेसने केले नाही ते नऊ वर्षांत मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या  बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे आदींची उपस्थिती होती. नड्डा म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची आहे. मोबाइल उत्पादनात, रेल्वे, रस्ते, अशा सर्व क्षेत्रांत पुढे आहे. कोरोनाचा फटका जगाला बसला; पण भारताला नाही. कारण मोदींनी संकटाला संधी मानले. राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतुक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतील पहिल्या सत्रात मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात मोदी व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नड्डा यांचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर भाषण झाले.पुरंदर तालुक्यातील माजी आमदार अशोक टेकवडे यांंना भाजपत प्रवेश देण्यात आला.

१.७५ लाख विशेष कार्यकारी अधिकारी येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.  महाविजय संकल्प ‘महापालिका निवडणुका राष्ट्रवादीमुळे रखडल्या. महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात गेली आहे, म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विलंबाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाMumbaiमुंबईcongressकाँग्रेस