शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘अनलॉक ४’मध्ये काय सुरु-काय बंद? पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:10 IST

राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही.

ठळक मुद्देहॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो, सिनेमागृह आणि शाळा-कॉलेज अद्याप बंद राहणार आहेत.

मुंबई : राज्यात अनलॉक ४ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. तसेच, हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो, सिनेमागृह आणि शाळा-कॉलेज अद्याप बंद राहणार आहेत.  मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

‘अनलॉक ४’मध्ये काय बंद राहणार?-  शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाईन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. - सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. - एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. - मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. - सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. -50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.- अंत्यविधी यासाठीदेखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही.- मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही.

‘अनलॉक ४’मध्ये काय सुरु राहणार? -  सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. - हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. - सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत.- खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, - आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. - खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. - टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र