शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 17:14 IST

अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरु झाली आहे.

महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाने केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे कारवाईची चिंता करू नका, असे शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावले आहे. 

अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरु झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटावरील अपात्रतेची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. यातच अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी अर्थखाते किती काळ टिकू शकेल माहिती नाही असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

किती इंजिन हे मोजण्यापेक्षा हे युतीचं इंजिन आहे. आताच्या या युतीला इंजिनला तीन डबे आहेत. येणाऱ्या काळात आणखी डबे जोडले जाणार आहेत असे सांगत इतर पक्ष हे युतीत सहभागी होतील असा  दावा पाटील यांनी केला आहे. आणखी एक इंजिन जोडले जाणार होते, परंतू तीन इंजिनवर व्यवस्थित सुरू आहे म्हणून चौथे इंजिन फलाटावर उभे आहे, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. यावर पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार भावी मुख्यमंत्री बॅनरबाजीवर अशा पद्धतीने बॅनर लावून मुख्यमंत्री आणि मंत्री होत नाही. मंत्री किंवा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 148 चा आकडा गाठावा लागतो. बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

उज्ज्वल निकम यांना लोकसभा उमेदवारी?विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचे नाव भाजकपडून जळगाव लोकसभा मतदारसंघात जाहीर करण्यात आले आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले की,  लोकसभेत उमेदवारी कोणी कोणाला द्यायची हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. उज्ज्वल निकम इच्छुक आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. सर्वेक्षण केल्यानंतर युती म्हणून सर्वांना चालणारा उमेदवार हा रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात असेल आणि युती म्हणून त्याच्याकडे बघितले जाणार आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारUjjwal Nikamउज्ज्वल निकम