राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 03:30 PM2024-01-27T15:30:07+5:302024-01-27T15:33:16+5:30

एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे...

What is the achievement of Raj Thackeray Let one to one come I say sadavarte's challenge | राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच चॅलेंज दिले आहे. झाले असे की, गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते. यावेळी तेथे असलेल्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की, या आरक्षणावरून आपली सेक्यूरिटी वाढविण्यात आली होती. त्यावर मनसे टीका करतेय की, तुमच्या सेक्युरिटीवर दर महिन्याला २० लाख रुपये खर्च होत आहेत, सरकारचे जावई आहेत का? याला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे.

काय म्हणाले सदावर्ते -
"कॅमेरे लावलेले आहेत, किती नोटा मोजल्या जात आहेत? हे बघायला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर खूप बोलू शकतो. आज ती वेळ नाही, आज तो विषय नाही. त्यांनी टोल नाके बघावेत आणि टोल नाक्यांवर किती पैसे मोजल जात आहेत? ते बघावं. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढे आणि माझ्यावर टीका करण्याऐवढे ते मोठे नाहीत,” असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

वन टू वन, समोरा समोर येऊ द्या, मीसांगतो... -
यावेळी राज ठाकरे यांना खुले चॅलेंज देत सदावर्ते म्हणाले, “वन टू वन, राज ठाकरे आणि सदावर्ते येऊद्या, मी सांगतो... कुणी कार्यकर्ते, छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही.” 

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयात जाणार -
महाठा आरक्षासंदर्भात बोलताना सदावर्ते म्हणाले, "मला आज असे सांगायचे आहे की, माझे मराठा भाऊ, जे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत,  त्या लाभापासून कुणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीने उभारलेले हे आंदोलन होते, असे मी समजतो. मात्र, आज आपण ते नोटिफिकेसन बघितले, तर ते नोटिफिकेशन नोटिस आहे. म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, माननीय उच्च न्ययालयात लवकरात लवकर, म्हणजे  मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे. या सर्व गोष्टींसाठी लवकच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल,"

Web Title: What is the achievement of Raj Thackeray Let one to one come I say sadavarte's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.