शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Gautami Patil Real Name: फक्त आडनावच नाही तर गौतमीच्या नावातही आहे घोळ; खरं नाव आलं समोर, वडील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:16 IST

Gautami Patil Real Name: शाळेच्या दाखल्यावर गौतमी असे नाव आहे. मात्र, तिचे खरे नाव वेगळे आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

Gautami Patil Real Name: सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते. राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच आता गौतमीचे वडील कोण आहेत, याबाबत माहिती मिळाली आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांनी गौतमीच्या नावाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला होता. मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी, मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने दिली होती. यानंतर आता गौतमी पाटील हिच्या वडिलांनी तिच्या खऱ्या नावाबाबत माहिती दिली आहे. 

शाळेतील दाखल्यावर गौतमी पाटील आहे, पण तिचे खरे नाव...

गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे यांनी गौतमीच्या नावाबाबत महत्त्वाची माहिती दिली. गौतमीच्या वडिलांनी तिच्या नावाबाबत बोलताना सांगितले की, गौतमीचे शाळेतील दाखल्यावरील नाव गौतमी पाटील आहे आणि जन्म नाव वैष्णवी आहे. मी २० वर्षांपासून गौतमी आणि तिच्या आईपासून वेगळा राहतो, असे ते म्हणाले. गौतमीने पाटील आडनाव लावू नये, असे सांगितले जात आहे. यावर बोलताना, जर तिचे आडनाव पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच. मला अनेकवेळा गौतमीची आठवण येते. पण तिच्याबरोबर कधी संपर्क झाला नाही. गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याबाबत  आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्यावर ज्या टीका करतात, त्याच वाईट वाटते, असे गौतमीचे वडील म्हणाले. 

दरम्यान, वडिलांना भेटायला जाणार का, असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला होता. यावर, मी इथपर्यंत कशी आली आहे, हे मी तुम्हाला सांगितले होते. हा कौटुंबिक प्रश्न आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. मी एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या मागे माझी आई आहे. मी यावर बोलू शकत नाही. कौटुंबिक वाद असल्याने तो इथे आणू इच्छित नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलCelebrityसेलिब्रिटी