शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 07:35 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

बई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला चांगलेच फटकारले. आरक्षणाचा हा मुद्दा काही महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. या आयोगाचे कामकाज कुठवर आले? उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल? याची संपूर्ण माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात यावा, यासाठी आर. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी अ‍ॅड. विजय किल्लेदार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. राज्य सरकारने २०१६ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, तर राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला पाठिंबा देणा-या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. राज्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आरक्षणाची ही मर्यादा ओलांडली जाणार आहे. त्यामुळे अनेकांनी या आरक्षणाला विरोध केला. उच्च न्यायालयानेही २०१६ मध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला आरक्षण देणे कितपत योग्य आहे, याची चाचपणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये हे प्रकरण मागास प्रवर्ग आयोगाकडे वर्ग केले.अद्याप हे प्रकरण आयोगाकडेच प्रलंबित असल्याने उच्च न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे सुनावणीवेळी आयोगाचे कामकाज कुठवर आले, हा मुद्दा उपस्थित झाला. जोवर ते काम पूर्ण होत नाही, आरक्षण देण्याबाबत त्यांचा अहवाल मिळत नाही, तोवर न्यायालयात पुढील सुनावणी होऊ शकत नसल्याने त्याची माहिती शुक्रवारी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाचे नेतृत्व करणाºया संघटनांनी मागील वर्षी राज्यभर अनेक मूक मोर्चे काढले होते. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चांमध्ये महिला व तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. यानंतर सरकारने समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. परंतु आरक्षणाच्या मुख्य मागणीवर काहीही ठोस निर्णय झाला नव्हता. या प्रकरणी सरकार न्यायालयात प्रामाणिक प्रयत्न युक्तिवाद करीत नाही, असा आंदोलकांचा आक्षेप होता.

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन