शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 06:15 IST

चर्चा रंगली; अध्यक्ष काेण, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष नक्की कोण, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. याबाबत सरळसरळ दोन गट पडल्याने, नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय घडेल आणि हा एकंदर वाद संपुष्टात तरी कधी येणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे. 

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी याआधी घेतलेल्या विशेष बैठकीत, नाट्य परिषदेच्या पुढील कार्यवाहीसाठी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांची बहुमताने निवड केली. मात्र त्यानंतर ही बैठकच अवैध असल्याचे मत नाट्य परिषदेकडून व्यक्त करण्यात आले. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी हेच असल्याचे परिषदेच्या मंडळींचे म्हणणे आहे. तर, प्रमुख कार्यवाह या नात्याने शरद पोंक्षे यांनी, नरेश गडेकर यांच्या अध्यक्षपदाला हरकत घेणारे पत्रच त्यांना पाठवले. त्यामुळे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, याचा फैसला सध्या अधांतरी आहे. या नाट्यात आता नाट्य परिषदेच्या विश्वस्तांपैकी एक असलेले शशी प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाल्याने, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाट्य अधिकच रंगले आहे. 

संस्था अधिक महत्त्वाची!

n यासंदर्भात विश्वस्त शशी प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता, नियामक मंडळाने बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा प्रसाद कांबळी यांनी मान राखायला हवा, अशी भूमिका मांडली. त्यांना नियामक मंडळाच्या ३९ सदस्यांचा विरोध आहे; तर त्यांनी ते समजून घेऊन राजीनामा देणे योग्य ठरेल. n वास्तविक, काम करण्याच्या बाबतीत प्रसाद कांबळी हे गुणी व्यक्तिमत्त्व आहे, मात्र त्यांनी इतर लोकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. आम्हाला नाट्यसंकुल पुन्हा सुरू करायचे आहे. कारण सगळ्यापेक्षा संस्था महत्त्वाची आहे, असेही शशी प्रभू यांनी सांगितले.