काय करावे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ?
By Admin | Updated: April 28, 2017 11:59 IST2017-04-28T11:25:51+5:302017-04-28T11:59:45+5:30
अक्षय्य तृतीया हा महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. कुठल्याही मंगल कार्यासाठी हा दिवस शुभ समजला जातो.

काय करावे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ?
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
अक्षय्य तृतीया हा महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. कुठल्याही मंगल कार्यासाठी हा दिवस शुभ समजला जातो. लग्नकार्यापासून गाडी, वास्तू किंवा एखाद्या नव्या वस्तूच्या खरेदीसाठी हाच दिवस निवडला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ "अक्षय्य"(न संपणारे) असते अशी धारणा आहे.
अक्षय्य तृतीयेला खासकरुन मोठया प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. या दिवशी कमीत कमी एकग्राम तरी सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. शेतकरी वर्गासाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे.
अक्षय्य तृतीया उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) राहते. आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजाही केली जाते आणि ती अक्षय्यी फलदायिनी असते, असेही सांगतात.
काय करावे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी
- या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
- तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
- नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
- जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.