शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व त्यांच्यापासून वेगळे झालात; तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 02:01 IST

"त्यावेळी पक्षाची सामुहिक भावना, या सरकारमध्ये सहभागी होण्याची निश्चितपणे होती."

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सामील झाले आहेत. यांपैकी आठ नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून, शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवारांचा एक गट, असे दोन गट तयार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. यावेळी तटकरे यांनीही विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. 

यावेळी, शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व जण त्यांच्यापासून वेगळे झालात. शरद पवार म्हणतायत की, मला या बंडाची कल्पना नाही, बंड झालं हे त्यांनी जाहीर केलं. तरीही, मीच याच्या पाठीमागे आहे, असा एक संभ्रम निर्माण केला जातोय. खरंच, शरद पवार या बंडाच्या पाठीमागे आहेत, असं तुमचं म्हणणं आहे? असा प्रश्न सुनिल तटकरे यांना केला असता, त्यांनी एका पत्राचा दाखला दिला.

यावर बोलताना तटकरे म्हणाले, मी काल एका मुलाखतीत म्हणालो आणि अजित दादांनीही परवा स्पष्ट केलं किंवा आम्ही दोघांनीही स्पष्ट करण्यापूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रवक्ते नव्याने नियुक्त झाले आहेत. त्यांनी त्याच्या नेहमीच्याच प्रसिद्धी लोलुपापोटी, एक पत्र शरद पवारांना लिहिलं गेल्याचा उल्लेख केला. त्यात दिलीप काका बनकरांचा उल्लेख करण्यात आला होता. 

पक्षाची सामुहिक भावना सरकारमध्ये सहभागी होण्याची होती - पुढे तटकरे म्हणाले, मी एवढंच सांगेन की, गेल्या वर्षी याच जून महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार जाणार, असं जेव्हा निर्विवादपणे दिसत होतं. तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आणि सर्व विधानसभा-विधान परिषद सदस्यांनी, सही करून, आता भारतीय जनता पक्षाबरोबर स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये सहभागी होणं, हे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. असं पत्र शरद पवारांना देण्यात आलं होतं. त्यामुळे, त्यावेळी पक्षाची सामुहिक भावना, या सरकारमध्ये सहभागी होण्याची निश्चितपणे होती."

बघा सविस्तर मुलाखत -

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार