शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

लाडकी बहीण योजनेला विरोध करता करता हे काय बोलून बसले संजय राऊत, शिंदेंची योजना हवी की नको...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:41 IST

Sanjay Raut on Ladki Bahin Yojana: विरोधकांना नेमकी काय भुमिका घ्यायची हे कळत नाहीय हे स्पष्ट होत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लोकसभेतील विजयामुळे कॉलर ताठ झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली.

महायुतीच्या शिंदे सरकारने अर्थसंकल्पावेळी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लोकसभेतील विजयामुळे कॉलर ताठ झालेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस तिजोरीत पैसे नाहीत, ही योजना निवडणुकीपुरतीच, नंतर पैसे मिळणार नाहीत, अशा अनेक टीका करत डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहेत. अशातच संजय राऊतांनीदेखील अनेकदा या योजनेवरून सरकारवर तोंडसुख घेतलेले असतान आज या योजनेला विरोध करायचे सोडून आम्ही निवडून आलो तर १५०० ते ३००० करू असे आश्वासन दिले आहे. 

विरोधकांच्या भुमिकेच्या विपरित संजय राऊतांनी घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत राऊतांनी अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी या त्यांना पराभूत करणार आहेत, असा दावा केला. याचवेळी त्यांनी भ्रष्टाचारी आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५ कोटी दिले जातात आणि लाडक्या बहीणींच्या खात्यात केवळ १५०० रुपये टाकले जातात, ते पण मत दिलं नाही, तर काढून घेऊ, या धमक्या दिल्या जातात, असा टोला राऊत यांनी लगावला.

रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा पराभूत झालेली आहे, आणि ते असे बोलत आहेत.पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहेत का? यांची मानसिकता सरकारी पैशाने मते विकत घ्यायची आहे, असे सांगत राऊत यांनी रवी राणा यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आमचे सरकार आले तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून ३००० करू असे राऊत म्हणाले आहेत. यावरून विरोधकांना नेमकी काय भुमिका घ्यायची हे कळत नाहीय हे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रातील 14 महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत. ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. लोकसभा निवडणूक घेतली कारण जगात नाचक्की झाली असती. या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील. महायुतीला लोकसभेचा सर्व्हे अनुकूल नव्हता, विधानसभेचाही नाहीय. यामुळे काहीही करून वेळेवर निवडणुका हव्या आहेत, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती