उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 08:26 AM2023-08-27T08:26:31+5:302023-08-27T08:27:28+5:30

मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात फडणवीसांनी जपान दौऱ्यात महाराष्ट्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती दिली.

What did Maharashtra get from Deputy Chief Minister Devendra Fadnavis visit to Japan? | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?

googlenewsNext

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच जपान दौऱ्यावरून मुंबईत परतले. मुंबईत आल्यानंतर विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जपानने स्टेट गेस्ट म्हणून देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण दिले होते. देवेंद्र फडणवीसांचा ५ दिवसीय जपान दौरा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात होता. मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात फडणवीसांनी जपान दौऱ्यात महाराष्ट्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती दिली.

जपान दौऱ्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची फौजच सोबत नेली होती. त्यामुळे मुंबईच्या विकासाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली जाईल अशी अपेक्षा होती. या दौऱ्यामुळे मुंबईत होणारा वर्सोवा- विरार सी लिंकच्या निर्मितीला जपाननं मदत करण्याचं आश्वासन दिले त्यामुळे या कामाला गती प्राप्त होईल. सोबतच मुंबईत सातत्याने येणारा पूर रोखणे, मेट्रो ११ प्रकल्प पुर्ण करणे यासाठीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जपानी गुंतवणूकदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुंबईला भेट देणार आहे. एनएनटीटीने गुंतवणूक दुप्पट करण्याची दर्शवलेली तयारी मुंबईच्या विकासाला अधिक गतिमान करु शकते. सोबतच जायका व जेट्रोसारख्या कंपन्यांशी सुरु असलेली चर्चा ही गुंतवणूकीत बदलू शकते. या गुंतवणूकीचे श्रेय पंतप्रधान मोदींमुळे आहे. २०१४ पासून जपानसोबत उत्कृष्ठ संबंध प्रस्थापित केल्यामुळेच भारताला ही गुंतवणूक मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईचा होणारा कायापालट

मेट्रो ११ म्हणजेच सीएसएमटी ते वडाळा मेट्रोचे काम जलद गतीने पुर्ण होण्यास मदत मिळणार आहे. सोबतच मुंबईतील पूर निवारणासाठी आधुनिक जपानी तंत्रज्ञानाची साथ मिळणार आहे. वर्सोवा ते विरार सी लिंकच्या कामाला जपानची मदत होणार आहे. यामुळे मुंबईची कनेक्टिव्हीटी वाढवण्यास मदत होईल. मेट्रो ३ चे काम जलद गतीने पुर्ण व्हावे यासाठी जायका कंपनीच्या गुंतवणुकीचा ४ व ५ हप्ता लवकरच मिळणार आहे. सोबतच कामातील अडथळे दूर करण्यासाठी कंपनीने पुढाकार घेण्याचं मान्य केलं आहे. एमटीएचएलमुळे तिसऱ्या मुंबईत होणाऱ्या बांधकाम क्षेत्राला मदत मिळेल. मेट्रो उभारणीत सुमिटोमोची गुंतवणूक व मेट्रो स्टेशनबाहेरील इमारतीच्या क्षेत्रात जपानी कंपन्या सहकार्य करणार आहेत अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्याला मिळणार ही मदत

पुण्याला स्टार्टअप हब म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. यामुळे राज्यातील बेरोजगारांना मोठी मदत मिळेल. सेमीकंडक्टर चीप्स या उद्योग क्षेत्राचं भविष्य आहेत. त्याचा कारखाना राज्यात व्हावा यासाठी जपान दौऱ्यात फडणवीसांनी प्रयत्न केलेत. त्यासाठी वाकायामा कंपनीच्या गुंतवणकदारांचे शिष्टमंडळ राज्याला भेट देईल. मराठी विद्यार्थ्यांना बौद्धधर्म अध्यास व संशोधनासाठी जपानी सरकार मदत करेल. एनटीटी डेटा कंपनीने आपली गुंतवणूक दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि नागपुर शहरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाय पावसाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पारंपारिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी जपानी सरकार मदत करणारंय.

Web Title: What did Maharashtra get from Deputy Chief Minister Devendra Fadnavis visit to Japan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.