शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

"यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:48 IST

BJP Criticize Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?

मुंबई - शिवसेनेत पडलेली फूट आणि महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ या घडामोडींपासून उद्धव ठाकरे हे भाजपा आणि भाजपा नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नैतिक अध:पतन झाल्याचा टोला लगावला होता. त्याला आता भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

केशव उपाध्ये म्हणाले की, आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल. पक्षाचे उरलेले अस्तित्व वाचवून राजकीय कडेलोटापासून स्वतःचा बचाव करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ज्यांनी प्रत्येक हाताचा आधार शोधला, आणि लहानमोठ्या पक्षांची मते ओरबाडण्याचा स्वार्थीपणा करून अधःपतनाची परिसीमा गाठली, त्यांनी राजकारणातील नैतिक अधःपतनाची चिंता करावी ही आत्मवंचना म्हणावी की आत्मपरीक्षण म्हणावे हा प्रश्नच आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपविली, बाळासाहेबांचे निष्ठावंत दुरावले, स्वतःचे पक्षप्रमुखपदही स्वहस्ते संकटात आणले आणि आता अस्तित्व टिकविण्यासाठी लहानमोठ्या पक्षांचे उंबरठे झिजविले. बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? पक्ष संपला, हाताशी नेतेही नाहीत आणि कार्यकर्तेही उरले नाहीत, स्वतःचे पदही राखता आले नाही आणि दोनचार लाळघोट्यांकरवी स्वतःवर स्तुतिसुमने उधळून घेण्याची वेळ आली, त्यांनी इतरांच्या अधःपतनाची उठाठेव करू नये. मुख्यमंत्रीपदावर असताना करोनामुळे घरात बसायची वेळ आली होती, आणि आता सारे काही गमावल्यामुळे घरात बसावे लागणार आहे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपसोबतची युती मोडून वेगळी चूल मांडणाऱ्या व नंतर सत्तेसाठी गोंडा घोळवत सरकारात सामील होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थावर त्यांचा लाऊडस्पीकर असलेल्या संजय राऊत यांनी अगदी अलीकडेच टोमणेबाज आरसा दाखविला आहे. बाळासाहेबांनी थापलेला शेंदूराचा थर आता उघडा पडला असून आतले दगड दिसू लागले आहेत. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी पक्षाचे दुकान मी बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्टांकडेही आधारासाठी हात पसरून शिवसेनेचे दुकान बंद केले असून बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखविला, असा चिमटा केशव उपाध्ये यांनी काढला. 

२०१९ मध्ये कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करून मतदारांना फसवून व युतीला दगा देत या अधःपतनाचे शिल्पकार ठरलेल्या ठाकरेंनी राजकारणातील अधःपतनावर बोलावे हा या शतकातला केविलवाणा राजकीय विनोद आहे. पडझड झालेल्या पक्षाला आणि पक्षाच्या आधाराने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्यासाठी यांनी आघाडीसाठी बाळासाहेबांनाही नाकारून राजकीय सोयीपुरते प्रबोधनकारांच्या विचारांचा बुरखा पांघरला हे अधःपतन नव्हे काय? प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांवर व बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या विचारावर सतत कडवट टीका केली होती. हे सोयीपुरते विसरून उद्धव ठाकरेंनी अखेरच्या बचावाकरिता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करताना बाळासाहेबांना डावलून प्रबोधनकारांचे नाव वापरले, या अधःपतनाला काय म्हणायचे? असा सवालही केशव उपाध्ये उपस्थित केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा