शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"अजित दादांनंतर काय? कुठे? कसे?; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाही, माझ्यावर...!"; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:51 IST

"आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणरा? यासंदर्भात राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. "आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पटेल म्हणाले, "आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांसंदर्भात विविध प्रकारच्या उलट सुटल चर्चा सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसऱ्या कुण्या व्यक्तीला निवडणार. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक पक्ष आहोत. नेतृत्वाचे दोन भाग आहे. पहिला आहे. विधिमंडळ आणि दुसरा आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा भाग संपला. मी राष्ट्रिय कार्याध्यक्ष, मी सांगितल्या प्रमाणे, मी अजित दादा आणि पवार साहेबांसोबत काम केले आहे. अजित दादांच्या निधनानंतर, या सर्वप्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी कुणावर राहणार, तर प्रफुल पटेलांवर राहणार. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने विधिमंडळ आणि राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रात सुनिल तटकरे यांच्यावर आहे. 

राष्ट्रवादी पक्षाकडून कुण्याही व्यक्तीने, आम्ही पुढे काय पावले उचलावेत यासंदर्भात इंडिकेशन्सदेखील दिलेले नाहीत. आम्हाला सर्वांच्या भावना समजतात. त्यापद्धतीने आम्ही सुनेत्रा ताईंसंदर्भात निर्णय केला. आणि पक्षाचा निर्णयही आम्ही त्याच पद्धतीने घेणार आहोत. 

"तर त्यांना लाज वाटायला हवी" -आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही, ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून साधे एक मतही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी आमच्या बद्दल काही वक्तव्य देणे योग्य आहे का? १९५२ पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून  दिले. मीही लोकसभेत अनेकवेळा महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कुणी कमेंट करत असेल, तर त्यांना लाज वाटायला हवी. 

पटेल म्हणाले, "मी महाराष्ट्राच जनप्रतिनिधी म्हणून येथे बसलेलो आहोत. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्या शिवायच होईल. यापलिकडे मी आणखी काय सांगावं? आमच्याकडून कधी यासंदर्भात विधानही आलेले नसताना, उगाचच्या उगाच असा प्रकारचे वादळ निर्माण करणे आणि आमच्या पक्षात संशयाचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत घेणेरडी गोष्ट आहे." 

"आमचा पक्ष आहे आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही. अजित दादांनंतर काय? कुठे? कसे? ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आहे. ती मी येग्य रितिने पार पाडत आहे, असे पलेट यांनी स्पष्ट केले." 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Patel clarifies: Not in race for NCP National President post.

Web Summary : Praful Patel clarified he won't be the NCP's National President after Ajit Pawar. He emphasized the party's competence to choose a leader, dismissing external advice and taking responsibility for smooth succession.
टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार