एसटी कर्मचाऱ्यांचे नव्या गणवेशासाठी ‘वेट अॅण्ड वॉच’
By Admin | Updated: May 11, 2017 03:17 IST2017-05-11T03:17:20+5:302017-05-11T03:17:20+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा ओळख असलेल्या खाकी गणवेशात बदल करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र

एसटी कर्मचाऱ्यांचे नव्या गणवेशासाठी ‘वेट अॅण्ड वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा ओळख असलेल्या खाकी गणवेशात बदल करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र गणवेशासाठी मागवलेल्या निविदेत तांत्रिक चुका असल्याने नव्याने निविदा मागवल्या आहेत. परिणामी एसटी कर्मचारी नव्या गणवेशासाठी ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशाचे डिझाईन केंद्र शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था तयार करणार आहे. यासाठी चार महिन्यांपूर्वी मागवण्यात आलेल्या निविदा महामंडळाकडे पोहचल्या नाहीत. या कारणात्सव नव्याने निविदा मागवण्यात आल्या. त्यामुळे नव्या गणवेशासाठी एसटी कर्मचाऱ्यांना तुर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागेल.