पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: April 5, 2016 07:56 IST2016-04-05T07:56:59+5:302016-04-05T07:56:59+5:30

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून विरारहून चर्चगेटकडे जाणा-या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे

Western Railway traffic disrupted | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ५ - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून विरारहून चर्चगेटकडे जाणा-या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. बोरिवलीत तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे बोरिवलीत वीजवाहक यंत्रणेत बिघाड झाला आहे. विरारहून मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईच्या दिशेने येण्यासाठी सकाळी निघत असतात त्यामुळे बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास स्टेशनवरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Western Railway traffic disrupted