पश्चिम महाराष्ट्राने मोठेपणा दाखवावा

By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30

विकास झाला नाही म्हणून मराठवाडा, विदर्भ जनतेच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली आहे. ती दूर करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाने केले पाहिजे,

West Maharashtra show greatness | पश्चिम महाराष्ट्राने मोठेपणा दाखवावा

पश्चिम महाराष्ट्राने मोठेपणा दाखवावा

मुंबई : विकास झाला नाही म्हणून मराठवाडा, विदर्भ जनतेच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली आहे. ती दूर करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाने केले पाहिजे, असा जेष्ठत्वाचा सल्ला गणपतराव देशमुख यांनी विधानसभेत दिला.
केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विधानसभेत चर्चा सुरू होती. सगळाच पश्चिम महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् नाही. तेथे देखील ऊसतोड कामगारांची भटकी जमात तयार झालेली आहे. माण, खटाव, सांगोला, कवठेमहांकाळ, जत यासारखे तालुके कायम दुष्काळी आहेत. जास्तीत जास्त पैसा आपल्या भागात आला म्हणजे विकास केला, असे होत नाही़ पण माझ्यासहीत सगळ्यांची हीच भावना झाली, ती बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
एक मेगावॅट वीज तयार झाली की, त्याच्या प्रदूषणाने एक व्यक्ती मृत्युमुखी पडते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले होते, असे म्हणत आ. सुधाकर देशमुख यांनी विदर्भात ६५ हजार मेगावॅटचे प्रकल्प येऊ घातले आहेत; मग आम्ही वर्षाला तेवढे लोक मृत्युमुखी पडू द्यायचे का, असा सवाल केला.
राधाकृष्ण विखे-पाटील
वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेतून काही साध्य झाले का, असा सवाल करीत ही मंडळे कालांतराने राजकीय पुनर्वसनाची माध्यमं बनली आहेत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. केळकर समितीने सुचवलेल्या कमिट्या स्थापन करण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विरोध दर्शवला होता; पण विखे-पाटील यांनी त्यास पाठिंबा दर्शवला.

Web Title: West Maharashtra show greatness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.